गडनदी पुलापासून ते मराठा मंडळ बंधाऱ्यापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार घनमीटर गाळ काढला

गडनदी पुलापासून ते मराठा मंडळ बंधाऱ्यापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार घनमीटर गाळ काढला
कणकवली : नाम फाऊंडेशन आणि लघु पाटबंधारे विभाग महाराष्ट्र शासन यांच्यावतीने कणकवली गडनदीपात्रातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. गडनदी पुलापासून ते मराठा मंडळ बंधाऱ्यापर्यंत जवळपास १ लाख ४० हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. हा गाळ काढण्यात आल्याने बंधाऱ्यापासून गडनदी पुलापर्यंत मुबलक प्रमाणात पाणी साठा होणार आहे.
मे महिन्यात देवगड तालुक्यातील दहिबांव नदीतील गाळ काढला जाणार आहे. नाम फाऊंडेशन मार्फत या हंगामात खारेपाटण, कुडाळ, वेंगुर्ले आदी भागातील नद्यांमधील गाळ काढण्यात आला. पुढील वर्षी कणकवली कनकनगर बंधाऱ्यादरम्यानचा गाळही काढला जाणार आहे. ल.पा.च्या यांत्रिकी विभागामार्फत गडीनदी पात्रातील दारिस्ते सह काही भागातील गाळ काढला जाणार असल्याचे सांगण्यात आले. गाळ काढल्यामुळे पावसाळ्यात पुराची तीव्रता कमी होणार असून उन्हाळ्यात नद्यांमध्ये प्रदीर्घकाळ पाणी साठा टिकून राहण्यास मदत होणार आहे.




