ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली… जिल्ह्यातील वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही…जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची हमी….
ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली... जिल्ह्यातील वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही...जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची हमी....

ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली… जिल्ह्यातील वाहनांकडून टोल घेतला जाणार नाही…जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची हमी….
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुलीला जरी सुरुवात झाली तरी जिल्ह्यातील वाहनांकडून (एमएच-०७) टोल घेतला जाणार नाही, याची जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून हमी देतो, अशा शब्दांत पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हावासीयांना दिलासा दिला. वादळी वारे आणि पावसाचा फटका बसलेल्या सावंतवाडी शहराला राणे यांनी शनिवारी सकाळी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी वरील आश्वासन दिले.
तीन वर्षांपूर्वी जेव्हा टोलवसुलीचा प्रयत्न झाला होता तेव्हा आमदार असताना आपण टोलवसुली होऊ दिली नाही. व्यापारी संघाचे अध्यक्ष संजय सावंत हे माझ्या संपर्कात होते, आहेत तेव्हा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्यातील वाहनांकडून टोल वसूल केला जाणार नाही, असे राणे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग-66 वर टोल वसुलीची प्रक्रिया सुरु केली असून कणकवली जवळ ओसरगाव टोल नाक्यावर टोलवसुली करण्यासाठी संस्था नेमण्यासाठी निविदा काढली आहे. निविदा निघताच जिल्ह्यात संतप्त प्रतिक्रिया उमतटल्या असून टोलविरोधी कृती समिती आणि व्यापारी संघाने स्थानिकांकडून टोल वसूल करण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.




