Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized
Trending

पत्रकाराने वास्तव तेच समाजासमोर मांडावे,असे मत कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक सुचेता देसाई..

यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, क्रीडापटू, कलाकार, साहित्यिक यांचा समावेश

पत्रकाराने वास्तव तेच समाजासमोर मांडावे,असे मत कोलवाळ येथील मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक सुचेता देसाई…..
पणजी :- ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात आपल्या कामातून स्वतःची वेगळी प्रतिमा तयार केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात आला .यात पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, वकील, क्रीडापटू, कलाकार, साहित्यिक यांचा समावेश होता.कार्यक्रम येथील फोटो जर्नालिस्ट हॉलमध्ये झाला.या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून सुचेता देसाई बोलत होत्या.व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सामाजिक कार्यकर्ते ॲड शैलेश गवस, नेहा शैलेश गवस, सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोलकर, नरेश शिरोडकर,असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर हुमरसकर आदी उपस्थित होते.
सुचेता देसाई यांनी सांगितले की, मी ३६ वर्षे पोलिस दलात सेवा केली. पण ,प्रसिद्धीपासून मुद्दामहून दूर राहिले.मीडियाच्या या व्यासपीठावरून मला काही सांगायचे आहे.पत्रकारांनी आपण जे लिहितो,जे दाखवतो ते जबाबदारीने मांडण्याची गरज आहे.लोकांना सत्य जाणून घ्यायला आवडते.त्यामुळे पत्रकारांनी वास्तव तेच मांडायला हवे.पत्रकारिता जबाबदारीने करणे आवश्यक आहे. लुथरा बंधू प्रकरणात एक चुकीची बिग ब्रेकिंग दाखवण्यात आली, ती माझ्यासाठी वेदनादायी होती.यात पोलिसांबद्दलची चुकीची प्रतिमा पुढे आली होती.अशावेळी वाचक किंवा दर्शक आपल्यासमोर आलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. तो शहानिशा करीत नाही.त्यामुळे चुकीचा संदेश पत्रकारितेतून समाजासमोर जाण्याऐवजी पत्रकारांनी स्वतः प्रत्येक गोष्टीची शहानिशा करून बातमी दिली ,तर ते केव्हाही चांगलेच! उगाच टीआरपीसाठी किंवा सनसनाटी निर्माण करण्यासाठी चुकीच्या बातम्या केल्या जाऊ नयेत,असे मला वाटते,असेही देसाई म्हणाल्या.
यावेळी सुचेता देसाई आणि नेहा गवस यांच्या हस्ते पत्रकार तारा नारायण , मिलन वायंगणकर,रश्मी नरसे – जोसलकर, वर्षा अश्वेकर ,
गायत्री हळर्णकर – कुंकळ्येकर, काव्या कोळस्कर व शमीमा हुसेन यांच्यासह डॉ नूतन डिचोलकर ,माही सिमेपुरुषकर ,ॲड. स्नेहा आरोंदेकर ,आरती टोपले, रोशन कोरगावकर ,प्रतिभा नागवेकर ,सोनिया एम. आरोंदेकर , वालंका फर्नांडिस ,विनिता हुमरसकर , शमिता सुनील संतिनेस्कर,ॲड. अपर्णा नरेश शिरोडकर यांचाही शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
राजेश दाभोलकर म्हणाले, महिला सुरक्षित झाल्या, तर महिला दिन साजरा करण्यात अर्थ आहे.अन्याय सहन करणे म्हणजे इतरांवर अन्याय करण्याचा मार्ग तयार करणे,त्यामुळे महिलांनी अन्याय सहन करू नये,त्याविरुद्ध आवाज उठवावा.
नेहा गवस म्हणाल्या,ज्यांचा सन्मान झाला त्यांनी आपापल्या क्षेत्रातील आपले काम सुरू ठेवावे, आपली सर्वांची कारकिर्द शब्दातीत आहे.त्यामुळे आपले कार्य असेच चालू ठेवा.
ॲड शैलेश गवस म्हणाले की,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महिला आहेत. त्या महिला असूनही उच्च पदावर आहेत.गोव्यातही अनेक महिलांनी आपले स्थान निर्माण केले आहे.अनेक महिलांनी कामातून इतिहास घडवला आहे.गोव्याचे नाव पुढे नेले आहे. या सगळ्यांना सगळ्यांचा हातभार लागल्यास समाजात बदल नक्की आहे,यासाठी
महिलांना १०० टक्के आदर द्या,असे आवाहनही गवस यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हुमरस्कर यांनी केले.सूत्रसंचालन मिलन वायंगणकर यांनी केले.आभार सागर लवंदे यांनी मानले.पाहुण्यांचे स्वागत गौरेश पेडणेकर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!