Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

फोंडा येथील राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

तातडीने 'विभाग प्रमुख' नियुक्त करण्याचा निर्णय

फोंडा येथील राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पूर्वतयारीसाठी शिवसेना उत्तर जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
शुक्रवार, दिनांक २१ ऑगस्ट रोजी फोंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या उत्तर गोवा शिवसेना राज्य कार्यकारिणी बैठकीच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून पणजी येथील मध्यवर्ती कार्यालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक उत्तर जिल्हा प्रमुख सुनील सांतिनेझकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीला उत्तर जिल्हा उपप्रमुख ॲड. अर्जुन गवंडी, तिसवाडी तालुका प्रमुख गजानन मुतगेकर, अनुसूचित जाती जमाती प्रमुख कमलाकर हुमरसकर, शिवोली विधानसभा संघ प्रमुख रामदास गोवेकर, पर्वरी विधानसभा प्रमुख किशोर फडते, तसेच दामोदर नाईक आणि सांताक्रूझ विधानसभा प्रमुख काशिनाथ सुर्लीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

*बैठकीतील महत्त्वाचे निर्णय व आवाहन:*
*उपस्थितीचे आवाहन:*
फोंडा येथे २१ ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्य कार्यकारिणी बैठकीला सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.

*नवनियुक्त्या:*

उत्तर गोव्यातील निवडक विधानसभा क्षेत्रांमध्ये तातडीने ‘विभाग प्रमुख’ नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.या सर्व नियुक्त्यांचा सविस्तर अहवाल लवकरात लवकर तयार करून सादर करण्याचे आदेश संबंधित प्रमुखांना देण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!