समाजसेवक आणि राजकारणी ऍड. अमित पालेकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

समाजसेवक आणि राजकारणी ऍड. अमित पालेकर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश..
पणजी :- समाजसेवक आणि राजकारणी ॲड. अमित पालेकर यांनी शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी ‘अलुवा ओपन एअर मर्सेस’ (Aluva Open Air Merces) येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या सोहळ्याला A.I.C.C. प्रभारी श्री. माणिकराव ठाकरे, A.I.C.C. सह-प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर, G.P.C.C. अध्यक्ष श्री. अमित पाटकर, विरोधी पक्षनेते श्री. युरी आलेमाव, श्री. ॲल्टन डी’कोस्टा, ॲड. कार्लोस फरेरा, माजी खासदार श्री. फ्रान्सिस्को सार्दिन्हा, माजी आमदार धर्म चोडणकर, उपाध्यक्ष एम. के. शेख व सुनील कवठणकर, माध्यम समिती अध्यक्ष अमरनाथ पांजिकर, OBC विभाग अध्यक्ष शरद चोपडेकर, ST विभाग अध्यक्ष रामकृष्ण जलमी, महिला काँग्रेस अध्यक्षा प्रतीक्षा खलप, युवक काँग्रेस अध्यक्ष अर्चित नाईक, सेवादल अध्यक्ष राजन घाटे, जवाहर बाल मंच अध्यक्षा पलागिया रापोसो, जिल्हा अध्यक्ष शशांक नार्वेकर, मंगळदास नाईक व असिस नरोन्हा, सेंट क्रूझ ब्लॉक अध्यक्ष जॉन नाझरेथ, उत्तर गोवा युवक काँग्रेस अध्यक्ष ट्रेव्हर फर्नांडिस यांसह इतर नेते आणि सेंट क्रूझ मतदारसंघातील अनेक नागरिक उपस्थित होते.



