Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना काँग्रेस (महासंघ) ने ॲड. अजय अर्जुन प्रभुगांवकर यांची गोवा राज्य अध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती

भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना काँग्रेस (महासंघ) – (INTUC ) ने ॲड. अजय अर्जुन प्रभुगांवकर यांची गोवा राज्य अध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती..

ॲड. अजय अर्जुन प्रभुगांवकर यांची गोवा राज्य अध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती..

भारतीय राष्ट्रीय कामगार संघटना काँग्रेस (महासंघ)
– (INTUC ) ने ॲड. अजय अर्जुन प्रभुगांवकर यांची गोवा राज्य अध्यक्षपदी तत्काळ नियुक्ती केली आहे.

ही नियुक्ती INTUC च्या राष्ट्रीय नेतृत्वाकडून करण्यात आली असून, कामगारांच्या—विशेषतः असंघटित क्षेत्रातील—कल्याणासाठी त्यांनी केलेल्या बांधिलकी, अनुभव आणि समर्पित कार्याची दखल घेऊन करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे गोव्यात INTUC ची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी या नियुक्तीचे स्वागत केले आहे. त्यांनी प्रभुगावणकर यांचे अभिनंदन करून INTUC च्या राज्याध्यक्ष म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शुभेच्छा दिल्या असून, त्यांच्या नेतृत्वाखाली गोव्यातील कामगार चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

आपल्या जबाबदाऱ्यांच्या अनुषंगाने प्रभुगावणकर यांनी निश्चित कालावधीत राज्य कार्यकारिणीची स्थापना करणे तसेच राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे, असेही नमूद करण्यात आले आहे.

INTUC ने त्यांच्या कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, गोव्यातील कामगारांच्या कल्याण, ऐक्य आणि सक्षमीकरणासाठी त्यांनी प्रभावीपणे कार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!