Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

दाबोली मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थिती…

दाबोली मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थिती…

पणजी :- राज्याध्यक्ष श्री दामू नाईक यांनी पं. दीनदयाती उपाध्याय प्रशिक्षण महाभियान 2026 अंतर्गत दाबोली मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेला उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी “भाजप कार्यपद्धती — समजून घ्या, आत्मसात करा आणि अंमलबजावणी करा” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, कार्यपद्धती आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमास डाबोळीमचे आमदार श्री माविन गोडिन्हो यांची विशेष उपस्थिती होती. तसेच वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

रम्यान, कार्यशाळेदरम्यान माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणही पाहण्यात आले. पंतप्रधानांनी मांडलेले विचार प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या प्रशिक्षण कार्यशाळेमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्याचा संकल्प करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!