कुचेली म्हापसा येथील सुभाष नाईक यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण
कुचेली म्हापसा सुभाष नाईक यांचा खुन... तपासा अंती निर्णय...

कुचेली म्हापसा येथील सुभाष नाईक यांचे संशयास्पद मृत्यू प्रकरण
शब्द मीडिया :- कुचेली येथील सुभाष नाईक यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक माहिती समोर आल्याने म्हापसा पोलिसांनी अखेर खुनाचा गुन्हा नोंदविला आहे. प्रारंभी मृत्यू नैसर्गिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे व खुनाचा संशय व्यक्त केला जात असल्यामळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे .
शवविच्छेदनात शरीरावर आढळलेल्या जखमा आणि वैद्यकीय निष्कर्षांवरून मृत्यू अनैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून मृताच्या हालचालींचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. तसेच मृताच्या ओळखीच्या व्यक्तींची चौकशी, मोबाईल कॉल रेकॉर्ड्सचा तपास आणि तांत्रिक पुरावे गोळा करण्यावर भर दिला आहे. या घटनेमुळे कुंचेली परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून दोषीना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनीही आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे म्हटले आहे.




