अभिनेते व निर्माते कमल हासन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना खुले पत्र….
अभिनेते व निर्माते कमल हासन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना खुले पत्र....

अभिनेते व निर्माते कमल हासन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना खुले पत्र….
पत्रक :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाल्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी केले होते.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनात सात मुद्द्यांचा समावेश होता. ते म्हणाले होते की, शक्य तिथे वर्क फ्रॉम होमला प्राधान्य द्या, वर्षभरासाठी सोने खरेदी टाळा, सार्वजनिक वाहतुकीचा अधिकाधिक वापर करून पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, स्वयंपाक बनवण्याच्या तेलाचा (खाद्यतेलाचा) वापर कमी करा, रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे वळा, स्वदेशीचा अधिकाधिक वापर करा, विदेशी उत्पादनं टाळा, वर्षभरासाठी विदेशी प्रवास टाळा अशी आवाहने पंतप्रधान मोदींनी केल्यानंतर देशभरात याची चर्चा सुरू आहे.
कमल हासन नेमकं काय म्हणाले?
आता लोकप्रिय अभिनेते व निर्माते कमल हासन यांचे एक खुले पत्र चर्चेत आले आहेत. पंतप्रधान मोदींनी केलेल्या आवाहनानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. अनेक चित्रपटांचे शूटिंग परदेशात होते, त्या संबंधित त्यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्रात त्यांनी चित्रपटांचे वाढते बजेट, मोठे ताफे (entourage), अनावश्यक खर्च यांबाबत चिंता व्यक्त केली आहे. तसेच, इंधन, ऊर्जा, वाहतूक आणि उत्पादन खर्च वाढत असल्याने भारतीय चित्रपटसृष्टीसमोरही मोठे आव्हान असल्याचे त्यांनी लिहिले. परदेशात शूटिंग करताना अनावश्यक खर्च होतो आणि त्यामुळे हा खर्च टाळण्याचे आवाहन त्यांनी चित्रपटसृष्टीला केले आहे. तसेच, परदेशातील महागड्या शूटिंगबाबत पुनर्विचार करण्याबद्दल सांगितले आहे.



