दंत दिनाच्या निमित्त डेन्टिस डॉक्टर रीना साईश लवंदे यांचा म्हापसाच्या नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका डॉक्टर नूतन बिचोलकर यांच्या हस्ते सत्कार
यांनी सांगितले की डॉक्टर रीना लवंदे यांचे कार्य खूप मोठे

दंत दिनाच्या निमित्त डेन्टिस डॉक्टर रीना साईश लवंदे यांचा म्हापसाच्या नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका डॉक्टर नूतन बिचोलकर यांच्या हस्ते सत्कार
म्हापसा :- ऑल गोवा डिजिटल जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे राष्ट्रीय दंत दिनाच्या निमित्त डेन्टिस डॉक्टर रीना साईश लवंदे यांचा म्हापसाच्या नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका डॉक्टर नूतन बिचोलकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन कलंगुट येथे सत्कार करण्यात आला.
यावेळी ऑल गोवा डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर हुमरसकर खजिनदार सागर लवंदे आदी उपस्थित होते .यावेळी बोलताना प्रमुख पाहुण्या
डॉ नूतन बिचोलकर यांनी सांगितले की डॉक्टर रीना लवंदे यांचे कार्य खूप मोठे आहे त्या कलंगुट तसेच परिसरात दंत विषयी माहिती देतात तसेच हायस्कूलमध्ये जाऊन लहान मुलांमध्ये दातांची कशी काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करतात . या प्रसंगी डॉक्टर रिना लवंदे यांनी आपले मनोगत केले कमलाकर हूमरसकर यांनी स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरेश पेडणेकर यांनी केले तर भारत बेतकेकर यांनी आभार मानले फोटो भारत बेतकेकर
डॉ रीना लवंदे हिचा सत्कार प्रसंगी डॉ नुतन बिचोलकर कमलाकर हूमरसकर व इतर



