Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

भाजपची खरी ताकद म्हणजे महिला शक्ती असून भाजपच्या विजयाची किल्ली महिलांकडे….राज्य सभेचे खासदार सदानंद शेट तानावडे

साळगाव मतदारसंघाच्या हितासाठी कॅसिनो हटवण्यात यश – संकल्प आमोणकर*

 

भाजपची खरी ताकद म्हणजे महिला शक्ती आहे. भाजपच्या विजयाची किल्ली महिलांकडे….राज्य सभेचे खासदार सदानंद शेट तानावडे

आज भाजपची खरी ताकद म्हणजे महिला शक्ती आहे. भाजपच्या विजयाची किल्ली महिलांकडे आहे. आज देशातील महिला सर्व क्षेत्रांत अग्रस्थानी राहून पुरुषांपेक्षा अधिक मेहनत करताना दिसत आहेत. ज्या देशात महिलांचे प्रमाण आणि सहभाग अधिक असतो तो देश अधिक बलवान होतो, असे प्रतिपादन राज्य सभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांनी आज वेरे येथे आयोजित केलेल्या जागतिक महिला दिना निमित्त कार्यक्रमात केले.
वेरे येथील क्रीडा मैदानावर साळगाव मतदार संघाच्या महिला मोर्चाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पुढे बोलताना म्हणाले की,
देशातील नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही. आज देशाच्या नेतृत्वाची धुरा कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या हाती असून ते मजबूत भारत उभारत आहेत. त्यामुळे कोणालाही चिंता करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

एलपीजी गॅस सिलेंडरबाबतही नागरिकांनी चिंता करू नये. आज प्रत्येक घरापर्यंत गॅस सिलेंडर पोहोचवण्याचे काम सुरू आहे आणि भविष्यातही याबाबत कोणतीही अडचण येणार नाही, असे स्पष्ट मतही त्यांनी व्यक्त केले.

आपल्या मतदारसंघात महिलांचे सशक्तीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. ही दूरदृष्टी लक्षात घेऊन आमदार केदार नाईक काम करत असून त्यांना सर्व क्षेत्रातील महिलांची साथ मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.

आज देशात महिला शक्ती सर्व क्षेत्रांत भरारी घेत आहे. महिलांच्या पाठबळावर येणाऱ्या 2027 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा केदार नाईक हे आमदार म्हणून निवडून येतील, अशी घोषणा देखील यावेळी खासदार सदानंद शेट तानवडे यांनी महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केली.

*साळगाव मतदारसंघाच्या हितासाठी कॅसिनो हटवण्यात यश – संकल्प आमोणकर*
————————————
साळगाव : मुरमुगाव मतदारसंघाचे आमदार तसेच Goa Sewerage Corporation चे अध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी सांगितले की साळगाव मतदारसंघाचे आमदार केदार नाईक हे नेहमीच मतदारसंघातील नागरिकांच्या प्रश्नांबाबत संवेदनशील असून लहान-मोठ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात.

काही दिवसांपूर्वी वेरे रईस -मागूस परिसराच्या दिशेने कॅसिनो येण्याची शक्यता असल्याचे समजताच आमदार केदार नाईक यांनी मतदारसंघाच्या हिताचा विचार करून तातडीने पुढाकार घेतला. त्यांनी हा विषय मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोर मांडत नागरिकांच्या भावना समजावून सांगितल्या.

या प्रकरणात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही सकारात्मक भूमिका घेत आमदार केदार नाईक यांच्या प्रयत्नांना साथ दिली. त्यामुळे संबंधित कॅसिनो हटविण्याचा प्रश्न सोडवण्यात यश मिळाले, असे आमदार संकल्प आमोणकर यांनी सांगितले.
महिला दिनाच्या आयोजित कार्यक्रमात
ते बोलत होते. या वेळी विविध मान्यवर आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

*महिला शक्तीमुळे देश प्रगतीच्या मार्गावर – आमदार केदार नाईक*
————————————
महिला ही अशी शक्ती आहे की ती घर-संसार सांभाळण्याबरोबरच देशाची जबाबदारीही समर्थपणे पेलू शकते. आज महिला सामाजिक, आर्थिक तसेच विविध क्षेत्रांत कार्य करत आपले जीवन देशासाठी समर्पित करत आहेत, असे प्रतिपादन साळगाव मतदारसंघाचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष केदार नाईक यांनी केले.

महिलांच्या सशक्तीकरणासाठी केंद्र आणि राज्य सरकार विविध योजना राबवत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महिलांचे जीवन अधिक सुखी आणि सक्षम करण्यासाठी अनेक उपक्रम सुरू केले असून त्यामुळे महिलांचे सशक्तीकरण अधिक बळकट होत आहे, असेही त्यांनी नमूद केले. साळगाव मतदार संघाच्या महिला मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिला दिनाचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल आमदार नाईक यांनी महिला मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक करून त्यांचे आभार मानले

यावेळी राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे, मुरमुगाव मतदार संघाचे आमदार तथा सेवेज महामंडळाचे अध्यक्ष संकल्प आमोणकर, सागावचे आमदार तथा गोवा पर्यटन विकास मंडळाचे अध्यक्ष केदार नाईक तसेच महिला मोर्चा अध्यक्षा नेहा केरकर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करून जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
याप्रसंगी महिला मोर्चाचे अध्यक्ष नेहा केरकर, मंडळ अध्यक्ष गौरेश मडकईकर, उत्तर गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सौ. रेशमा बांदोडकर सरपंच सुश्मिता पेडणेकर यानी आपले विचार प्रगट केले.
यावेळी उत्तर गोवा भाजपा सचिव रमेश घाडी, गोवा प्रदेश महिला मोर्चा सेक्रेटरी शितल वझरकर, प्रतीक्षा मयेकर, मंडळ जनरल सेक्रेटरी दीपक राणे, महिला मोर्चा सचिव दीक्षा नाईक, मंडळ युवा अध्यक्ष करण गोवेकर, सरपंच सुष्मिता पेडणेकर, राजेश कळंगुटकर, अजय गोवेकर, लुकास रेमेडीयो कल्पेश नाईक
सहा पंचायतीचे उपसरपंच पंच सदस्य व मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित होता.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रीती पुरखे यांनी केले तर दीक्षा यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!