Welcome to SHABD MEDIA   Click to listen highlighted text! Welcome to SHABD MEDIA
Uncategorized

४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप सोहळा गोव्यात साजरा

४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप सोहळा गोव्यात साजरा

४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ चा समारोप सोहळा गोव्यात साजरा

म्हापसा :- १५ मे २०२६, खाण सुरक्षा महासंचालनालयाच्या (DGMS) अधिपत्याखालील खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेने (गोवा, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर) आज गोव्यात ४२ व्या खाण सुरक्षा सप्ताह २०२५-२६ च्या समारोप सोहळ्याचे आयोजन केले. या कार्यक्रमाचे आयोजन फोमेंटो रिसोर्सेस प्रायव्हेट लिमिटेडने केले होते,

या समारोप सोहळ्याला भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या, पश्चिम विभाग, खाण सुरक्षा उपमहासंचालक, श्री रामावतार मीना यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून शोभा वाढवली.

व्यासपीठावर उपस्थित असलेल्या इतर मान्प्रवरांमध्ये श्री रमेश वालिकर संयोजक- खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व खाण सुरक्षा संचालक, गोवा विभाग, श्री आफताब अहमद, खाण सुरक्षा संचालक -खाणकाम, पश्चिम विभाग, नागपूर, श्री पी. के. जैन, खाण सुरक्षा संचालक यांत्रिक, पश्चिम विभाग, नागपूर श्री टी. श्रीनिदास, खाण सुरक्षा संचालक विद्युत, पश्चिम विभाग, नागपूर; श्री राजीव कुमार, अध्यक्ष – खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व खनिज संसाधन प्रमुख, गोवा व उत्तर प्रदेश, फोमेंटो रिसोर्सेस: श्री धीरजकुमार जगदीश, उपाध्यक्ष – खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांता लिमिटेड; आणि श्री संदीप मोरजकर, सचिव खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषद व महाव्यवस्थापक फोमेंटो रिसोर्सेस यांचा समावेश होता.

खाण सुरक्षा सफाह साजरा करण्याचा उद्देश खाण उद्योगातील अपघात कमी करणे, व्यावसायिक धोके टाळणे आणि शून्म-हानीयुक्त कार्य वातावरणाला प्रोत्साहन देणे हा आहे. या कार्यक्रमात खाण व्यवस्थापन, कामगार, सरकारी अधिकारी आणि खाण उद्योगाशी संबंधित इतर हितधारकांनी सहभाग घेतला. गोवा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रायगड आणि रत्तागिरी विभागातील ५० खाणींनी १५ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२५ या कालावधीत सुरक्षा सप्ताह सोहळ्यात सहभाग घेतला.

४२ व्या खाण सुरक्षा सफाहाचा भाग म्हणून, खाण उद्योगात सुरक्षा जागरूकता आणि सर्वोत्तम पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी परिसंवाद, विविध शाखांमधील व्यावसायिक चाचण्या आणि प्रथमोपचार स्पर्धा यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते.

खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे अध्यक्ष श्री राजीव कुमार आणि उपाध्यक्ष श्री धीरजकुमार जगदीश यांनी मान्प्रवरांचे स्वागत केले, तर खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे सचिव श्री संदीप मोरजकर यांनी खाण सुरक्षा सप्पाहाचा अहवाल सादर केला.

प्रमुख पाहुणे श्री रामावतार मीना यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

या प्रसंगाचे स्मरणार्थ एक स्मरणिका प्रमुख पाहुणे, श्री रामावतार मीना, उपमहासंचालक, खाण सुरक्षा, पश्चिम विभाग, नागपूर आणि इतर मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. व्यासपीठावर उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आणि इतर मान्प्रवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला.

पुढील खाण सुरक्षा सप्ताहाचे यजमानपद वेदांता लिमिटेडने स्वीकारले

खाण सुरक्षा आणि उत्पादकता परिषदेचे सचिव, श्री संदीप मोरजकर यांनी केलेल्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

फोटो कॅप्शनः प्रमुख पाहुणे श्री रामावतार मीना, श्री रमेश वालिकर, संयोजक खाण सुरक्षा व उत्पादकता परिषद अणि खाण सुरक्षा संचालक, गोवा विभागः श्री आफताब अहमद, खाण सुरक्षा संचालक खाणकाम, पश्चिम विभाग, नागपूर, श्री पी. के. जैन, खाण सुरक्षा संचालक यांत्रिक, पश्चिम विभाग, नागपूर, श्री टी. श्रीनिवास, खाण सुरक्षा संचालक विद्युत, पश्चिम विभाग, नागपूर; श्री राजीव कुमार, अध्यक्ष खाण सुरक्षा व उत्पादकता परिषद आणि खनिज संसाधन प्रमुख गोवा व उत्तर प्रदेश, फोमेंटो रिसोर्सेस, श्री धीरजकुमार जगदीश, उपाध्यक्ष खाण सुरक्षा व उत्पादकता परिषद आणि उप-मुख्य कार्यकारी अधिकारी, वेदांता लिमिटेड; आणि श्री संदीप मोरजकर, सचिव – खाण सुरक्षा व उत्पादकता परिषद आणि महाव्यवस्थापक फोमेंटो रिसोर्सेस यांच्या हस्ते स्ट्रॉलचे उद्घाटन

फोटो कैफान्ट प्रमुख पाहुणे श्री रामावतार मीना, श्री रमेश वालिकर संयोजक खाण सुरक्षा आणि उत्पाद परिषद आणि संचालक, खाण सुरक्षा, गोवा विभाग, श्री आफताब अहमद, संचालक, खाण सुरक्षा खाणकाम, चिम विभाग, नागपूर श्री पी. के. जैन, संचालक, खाण सुरक्षा यांत्रिक, पश्चिम विभाग, नागपूर श्री टी. श्रीनिवास खाण सुरक्षा विद्युत, पश्चिम विभाग, नागपूर, श्री राजीव कुमार अक्षयाण सुरक्षा आणि उत्ता परिषद अणि प्रमुख निधन, गोवा व उत्तर प्रदेश, फोमेटोरिसे श्री धीरकुकर जगदीश उपाकृक्ष-बाण सुरक्षा आणि उदकता परिषद आणि उप-मुख कार्यकारी अधिकारी वेदांता लिमिटेड आणि श्री दीपकरण सुरक्षा आणि उदकता परिषद आणि मन्यवस्थापक फोमेटो रिसोरोस पांचा हन्हें दीपप्रकृत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Click to listen highlighted text!