Uncategorized

मुख्यमंत्री सावंत, अरविंद केजरीवाल यांनी डॉ. भाटिकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला 

मुख्यमंत्री.. केजरीवाल,काँग्रेस नेत्याकडून भाटिकर यांना श्रद्धांजली

मुख्यमंत्री सावंत, अरविंद केजरीवाल यांनी डॉ. भाटिकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल, काँग्रेस नेते समाज सेवक, मित्र परिवार यांच्यासह अनेक नेत्यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते डॉ. केतन भाटिकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

नुकत्याच रद्द झालेल्या  फोंडा  विधानसभा पोटनिवडणुकीतील काँग्रेसचे उमेदवार असलेले भाटिकर (३८) यांचे काल रात्री सर्पदंशामुळे निधन झाले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्यांच्या हँडलवर लिहिले, “प्रख्यात फिजिओथेरपिस्ट डॉ. केतन भाटिकर यांच्या अकाली निधनाचे वृत्त ऐकून तीव्र धक्का बसला आणि दुःख झाले. त्यांचे जाणे ही वैद्यकीय समुदायासाठी एक मोठी हानी आहे.”

“या अत्यंत कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांना आणि मित्रांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो,” असे ते म्हणाले.

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या हँडलवर लिहिले, “गोव्याचे एक सुप्रसिद्ध आणि प्रमुख नेते डॉ. केतन भाटिकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून धक्का बसला आणि दुःख झाले.”

“या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना, प्रियजनांना आणि समर्थकांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. ओम शांती,” असेही त्यांनी पुढे लिहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!