Uncategorized

कमलाकर हुम्रस्कर यांचे पेडणे मधील बेरोजगारीवरून सरकारला प्रश्न…

पेडणेच्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य

कमलाकर हुम्रस्कर यांचे पेडणे मधील बेरोजगारीवरून सरकारला प्रश्न…

पेडणे :- मतदारसंघातील मुख्य समस्यांपैकी एक म्हणजे बेरोजगारी. इतक्या वर्षांपासून ही समस्या सोडवण्यात कोणीही विशेष रस घेतलेला नाही. पेडणे मध्ये मोपा विमानतळ आणि आयुष रुग्णालयासारखे मोठे प्रकल्प उभे राहिलेले आपण पाहिले आहेत, तरीही आपल्या तरुणांना तिथे अजूनही नोकऱ्या मिळत नाहीत.
सरकार २२,००० नोकऱ्या निर्माण करणार असल्याचे सांगते, पण नोकऱ्या फक्त निवडणुकीच्या वेळीच का निर्माण होतात? गेल्या १५ वर्षांपासून सरकार कुठे होते? हा केवळ एक राजकीय स्टंट आहे का?
आपले तरुण बेरोजगार का आहेत? हॉटेल उद्योग असो, आयुष रुग्णालय असो किंवा मोपा विमानतळ असो, आपण पाहतो की बहुतेक कर्मचारी बाहेरचे असतात, गोव्याचे नसतात.
अनेक वर्षांपासून पेडणे मतदार संघांमध्ये उपमुख्यमंत्री, आमदार आणि मंत्री निवडले आहेत, पण कोणीही ही समस्या सोडवलेली नाही. प्रत्येकजण नोकऱ्या देण्याबद्दल आश्वासने आणि प्रचार करतो, पण तरुणांसाठी कोणीही प्रामाणिकपणे काम करत नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीत मी निवडून आल्यास, मी पेडणे मतदार संघात आयटी प्रकल्प, उद्योग वसाहती आणि इतर रोजगार निर्माण करणारे उपक्रम आणण्यासाठी काम करेन.  पेडणेच्या स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधींमध्ये प्राधान्य दिले जाईल, हे आम्ही सुनिश्चित करू,” असे जनतेचे उमेदवार कमलाकर हुम्रस्कर म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!