शब्दशारदा परिवार आणि ऑल गोवा डिजीटल जनर्लीस्ट असोसिएशन तर्फे आंबेडकर जयंती…
13 एप्रिल 26 रोजी पूर्व संधेला म्हापसात आंबेडकर जयंती

शब्दशारदा परिवार आणि ऑल गोवा डिजीटल जनर्लीस्ट असोसिएशनतर्फे आंबेडकर जयंती…
म्हापसा : शब्दशारदा परिवार आणि ऑल गोवा डिजीटल जनर्लीस्ट असोसियेशन असोसिएशनतर्फे आज दि. १३ रोजी सायं. ४ वा. पुर्वसंधेला तुळशीराम हॉल, मरड म्हापसा येथे 135 वी डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकर, प्रमुख वक्ते (पत्रकार ) प्रभाकर ढगे, सन्मानीय पाहुणे (शिक्षक, कलाकार ) नामदेव नाईक विशेष अतिथी माजी नगराध्यक्ष विध्यमान नगरसेवक सुधीर कांदोळकर, माजी नगराध्यक्षा विध्यमान नगरसेविका डॉ. सौ.नूतन बिचोलकर, समाज सेवक राजेश दाभोलकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी नाट्यकलाकार व विविध पैलूत आपली छबी उमटणारे विनायक नागवेकर, महेश चव्हाण, राज शर्मा, सुभाष रेडकर, वैष्णवी उगाडेकर, गोपाळदास आर्लेकर, प्रसन्ना साळकर, यांचा सत्कार होणार आहे.




