भूतवाडी पेडणे येथे शिवसेनेची कोपरा बैठक संपन्न
स्थानिक विकास कामावर भर देण्याचे आश्वासन

भूतवाडी पेडणे येथे शिवसेनेची कोपरा बैठक संपन्न
पेडणे :-भूतवाडी पेडणे येथे घेतलेल्या कोपरा बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली व पेडणे मतदार संघात कसा विकास होणार हेही स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीत उपस्थित असलेल्या महिलांनी आपले महत्वपूर्ण विचार व्यक्त केले. सरकार कडून आम्हाला सहकार्य मिळत नाही. या ठिकाणी वीज पाणी रस्ते या समस्यावर विचार केला जात नाही. अशा महत्वपूर्ण विषयावर भर देण्याची आवश्यकता आहे असे मत व्यक्त करण्यात आले.
यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी समस्या जाणून घेतल्या व स्थानिक विकास कामावर भर देण्याचे आश्वासन देण्यात आले.
पक्ष बळकट करून प्रत्येक वाड्यावर संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जाणार असेही ठरवण्यात आले. युवा व महिलांना सक्रिय करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत उत्तरगोवा एससी मोर्चा प्रमुख- कमलाकर हम्रस्कर..पदाधिकारी -एड. अर्जुन गवंडी, जिल्हा उपाध्यक्ष -दिवाकर आरोलकर, पेडणे तालुका प्रमुख – योगेश आखडकर, पुंडलिक धारगळकर व इतर प्रमुख कार्यलर्त्यांनी मार्गदर्शन केले.




